आता हेच राहिले होते… आढळला नवा कोरोना, वाचा काय होणार…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कोरोना व्हायरसमध्ये नवनवे बदल दिसून येत आहेत कोराना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा भारताला फटका बसला आहे.

सध्या सर्वांच्या मनात डबल म्यूटेंट आणि ब्रिटन तसेच ब्राझीलमधून आलेल्या कोरोना विषाणूंची चिंता आहे. त्यातच कोरोनाचं आणखी एक रुप आढळल्यानं हे संकट आणखी वाढलं आहे.

B.1.618 म्हणजेच ट्रिपल म्यूटेंटअसं या प्रकाराचं नाव असून तो बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात आढळला आहे. हा विषाणू मोठ्या प्रमाणात संक्रमित होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘इंडिया टुडे’ नं दिलेल्या वृत्तानुसार या व्हायरसच्या नावातच याची माहिती आहे.

यामध्ये तीन म्यूटेशनचा समावेश आहे. हा व्हायरस किती धोकादायक आहे, याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र याचा पश्चिम बंगालध्ये मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत.

या निवडणुकांचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर असतानाच या नव्या कोरोनामुळे प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

या विषयावर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ” या व्हायरसचा कोरोना व्हॅक्सिनवर देखील परिणाम होऊ शकतो. कारण या व्हायरसमध्ये मोठा म्यूटेशन असून त्याचं E484K असं नाव आहे.

करोनाने रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या तीन प्रतिकारशक्ती या नवीन व्हायरसपुढे प्रभावी ठरलेल्या नाहीत. व्हायरसमध्ये बदल झाल्याने आधीच्या व्हायरसविरोधात तयार झालेली प्रतिकारशक्ती प्रभावी ठरत नाही

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe