अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-शिक्षण विभागाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे.
ऐन सणासुदीत शिक्षकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पगार द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिक्षक भारतीचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना गाडगे म्हणाले कि, कोरोनाच्या कामामध्ये अनेक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून शिक्षक काम करत आहेत.
काम करताना अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. आजही काही शिक्षक रुग्णालयात तर काही होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकेकडून तगादा सुरू आहे. मात्र पगार झाला नसल्याने अनेकजण नैराश्यात आहेत.
काही दिवसांपासून आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षण विभागातील कारभाराबद्दल आवाज उठवला होता. आता शिक्षकांचे पगार तातडीने द्या, अशी मागणी शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|