अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-अहमदनगर जाब विचारल्यावर मायालेकास शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने डोके फोडण्याची धक्कादायक घटना – बोल्हेगाव फाटा येथे रेणुकानगर मधील सागर हौसिंग सोसायटी येथे घडली आहे.
दरम्यान या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून रमेश शेळके, विकास रमेश शेळके व सुनीता रमेश शेळके यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, विमल बाबासाहेब हापसे या मुलगा दीपकसह घरासमोर उभ्या असताना रमेश शेळके त्यांचा मुलगा व पत्नी हे मोठ्याने हसू लागले.
आता हिचा भाऊ मेला हिला कोणाचा आधार नाही असे म्हटल्यावर दीपक हापसे यास राग आल्याने त्याने याबाबत जाब विचारला.
यावेळी रमेश सह पत्नी व त्याचा मुलगा यांनी शिवीगाळ केली. व त्यांनी विमल हापसे व दीपक हापसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने डोके फोडले. याप्रकरणातील शेळके या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|