ऐकावं ने नवलच : मुल जन्माला घालण्यासाठी जन्मठेपेच्या आरोपीला पॅरोल मंजूर!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-आतापर्यंत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना लग्न, जवळच्या नातेवाईंकांच्या अंत्यसंस्काराठी पॅरोल देण्यात आल्याची प्रकरणे आहेत.

मात्र, मुल जन्माला घालण्यासाठी एका आरोपीला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. असा पॅरोल पहिल्यांदाच मंजूर करण्यात आला आहे. पाटणा हायकोर्टाने या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

बिहारमध्ये हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एका आरोपीला अपत्याला जन्म देण्यासाठी कोर्टाने 15 दिवसांचा पॅरोल दिला आहे. विकी कुमार असं आरोपीचं नाव आहे. आरोपी विकी कुमार हा नालंदा जिल्ह्यातील उतरनावा गावचा रहिवासी आहे.

2012 मध्ये एका हत्येच्या प्रकरणात त्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो बिहारच्या शरीफ जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. वकिलांच्या सल्ल्यानुसार विकीची पत्नी रंजिताने अपत्याला जन्म देण्यासाठी विकीला पॅरोलवर सोडण्यात यावं,

अशी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. रंजिताच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने विकीला 15 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात यावं, असा आदेश दिला आहे. विकीनं सांगितलं की लग्न झाल्यानंतर

सहा महिन्यांनी हत्येच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात जावं लागलं. तुरुंगातील भेटीदरम्यान विकीने याबद्दल देवेंद्र शर्मा यांना सांगितलं. त्यानंतर शर्मांच्या सल्ल्यानुसार विकीची पत्नी रंजिताने पाटणा हायकोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेवर कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत विकीला पॅरोलवर सोडण्याचा निर्णय दिला. याप्रकरणी हायकोर्टाचे वकील गणेश शर्मा म्हणाले, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

वकील देवेंद्र शर्मांच्या सल्ल्यानुसार रंजिताने 2019 मध्ये विकीला पॅरोलवर सोडण्यात यावं, अशी याचिका हायकोर्टात दाखल केली. विकीला न सोडल्यास तिला आयुष्यभर मुलांशिवाय राहावं लागेल, असं तिनी याचिकेत म्हटलं होतं.

तिची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने विकीला सोडण्याचा निर्णय दिला. बॉलिवूडचा ‘मुद्दत’ या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री जयाप्रदा वंशवृद्धीसाठी चित्रपटाचा हीरो मिथुन चक्रवर्ती याला पॅरोलवर सोडावं अशी विनंती कोर्टात करते असं दाखवलं आहे. तशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!