‘मी दिलेला शब्द पाळणारा आहे, वाचाळवीर नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- ‘ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, विकासकामांसाठी २५ लाख मिळवा’ असे आवाहन करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना हा निधी उपलब्ध करून दिला.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांदरम्यान आमदार लंके यांनी निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शंका उपस्थित करत इतका मोठा निधी कोणी देऊ शकत नाही, असे सांगत हा राजकिय स्टंट असल्याची टीका केली होती.

त्यावेळी लंके यांनी ‘मी दिलेला शब्द पाळणारा आहे, वाचाळवीर नाही’ असा टोला दरेकर यांना लगावला होता. तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी हंगे, शिरापूर, रांधे, कारेगाव, वेसदरे, पिंप्रीपठार, जाधववाडी, भोयरेगांगर्डा व पळसपूर ग्रामपंचायत बिनविरोध झाली.

नगर तालुक्यातील अकोळनेर बिनविरोध झाली. तब्बल २१० सदस्य बिनविरोध निवडले गेले. निधी मंजूर झालेली गावे : पाबळ – तळेवाडी ते पांढरकरवस्ती रस्ता १५ लाख, जवळा – जवळा ते गाडीलगाव रस्ता २५ लाख, पळसपूर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण २५ लाख, शिरापूर येथे उचाळे वस्ती शिरापूर रस्ता २५ लाख,

हंगे येथे सामाजिक सभागृह ५० लाख, भोयरे गांगर्डा येथे गजाबाई मुक्ताबाई मंदिर पेव्हींग ब्लॉक २५ लाख, कारेगाव चारंगेश्‍वर मंदिर सभागृह १५ लाख, मुक्ताबाई मंदिर पेव्हींग ब्लॉक १० लाख, पिंप्रीपठार येथे भैरवनाथ मंदीर सभामंडप २५ लाख,

वेसदरे सांस्कृतिक भवन २५ लाख, जाधववाडी स्मशानभूमी १० लाख, प्रवेशद्वार १५ लाख, रांधे येथे रांधूबाई सभामंडप १५ लाख, मुस्लिम प्रार्थनास्थळ सुशोभीकरण १० लाख, देसवडे येथे टेकडवाडी ते काळेवाडी घाट २५ लाख,

राळेगणथेरपाळ येथे डोमेवस्ती ते खंडोबावस्ती रस्ता १५ लाख, कडूस येथे वाघाजाई मंदिर सभामंंडप ५ लाख, नांदूरपठार येथे श्रीकृष्ण मंदिर सुशोभीकरण ५ लाख, बाबुर्डी बेंद – गावठाण ते शिवरस्ता २५ लाख, पिंप्रीघुमट ते हंंडेवस्ती रस्ता नळकांडी पुलासह २० लाख,

अकोळनेर काँक्रिटीकरण १० लाख, देऊळगावसिद्धी सांस्कृतिक सभागृह ५० लाख, बाबुर्डी घुमट रस्ता २० लाख, नांदगांव येथे होलट वस्ती ते कोलबेट रस्ता १० लाख, हिंगणगाव येथे कुरणमळा रस्ता २५ लाख.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe