संगमनेर : संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकली चोरी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून मंगळवारी पुन्हा चिखली शिवारातील लक्ष्मी माता मंदिरापासून वीस हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केला आहे.
यामुळे मोटारसायकल चोरांनाही संगमनेर शहराचा लळा लागला की काय, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. त्यामुळे मोटारसायकल स्वारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अभय परमार हे कधी या मोटारसायकल चोऱ्यांच्या मुसक्या आवळणार,असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

गेल्या एक ते दोन महिन्यांपासून संगमनेर शहरातील ठिकठिकाणच्या भागातून व हॉस्पीटल समोरुन अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकली चोरुन पोबारा केला आहे. पण अद्यापही शहर पोलिसांना या मोटारसायकल चोरट्यांचा शोध लावता आला नाही.
त्यामुळे मोटारसायकलस्वार अक्षरश: चोरट्यांना वैतागले आहेत. जवळपास एका एका मोटारसायकलची किंमत दहा ते वीस हजार रुपये ऐवढी आहे. गुन्हा दाखल करण्यापलीकडे पोलिस काहीच करत नाही. हे चोरटे बरोबर पाळत ठेवून मोटारसायकली चोरुन पोबारा करत आहेत. आत्तापर्यंत अनेक मोटारसायकली चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
- कोपरगावमध्ये ६४ इमारती धोकादायक, पालिसा प्रशासनाने मालकांना पाठवल्या नोटीसा, लवकरच इमारती केल्या जाणार जमिनदोस्त
- पुण्याला मिळणार एकूण 11 नवे मेट्रो मार्ग ! आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील ‘या’ भागाला मिळणार मेट्रोची भेट, पहा….
- महाराष्ट्रात तयार होणार 5 नवीन महामार्ग ! कसे असणार रूट ?
- भावी नवरदेवांनो ! Ahilyanagar जिल्ह्यातील ‘या’ भागात लग्न जमवून देणारी टोळी सक्रिय, आत्तापर्यंत अनेक तरूणांना घातलाय लाखोंचा गंडा
- शेतकऱ्यांनो मका पिकावर लष्करी अळी पडतेय, नुकसान टाळण्यासाठी आजच हे उपाय करा, वाचा सविस्तर!