अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य विभागाला जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी टेस्टिंग किटची कमतरता पडू देऊ नका, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घातले.
वाढत्या कोरोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
कोरोना बाधित रुग्णांची रोजची आकडेवारी पाहता कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यात देखील मागील एक महिन्यापासून कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून दररोज करण्यात येत असलेल्या तपासणीतून शेकडो रुग्णांची भर बाधित रुग्णाच्या संख्येत पडत आहेत.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची तपासणी करावी लागणार असून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन तपासणी करावी लागणार आहे.
आढळून येत असलेल्या बाधित रुग्णाच्या संख्येचा विचार करता यापुढे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग किटची आवश्यकता भासणार आहे.
त्यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रत्येक व्यक्तीची तपासणी करावी लागणार आहे.
त्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग किटची आवश्यकता भासणार असून आवश्यक असणारा टेस्टिंग किटचा पुरवठा कोपरगाव तालुक्यासाठी करण्यात यावा, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना घातले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|