अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातच जिल्ह्यात दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे.
यातच नगर शहरामध्ये कोरोनाचे दररोज सुमारे ८०० ते ९०० रुग्ण सापडत आहेत. अशी सर्व परिस्थिती पाहता शहरातील सर्वसामान्य नागरिक,
गोरगरीब लोकांसाठी मनपाने तातडीने जम्बो ऑक्सीजन कोविड सेंटर उभारण्याची मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या कोरोना आढावा बैठकीत केली आहे.
एमआयडीसीतील वखार महामंडळ तसेच मोठ्या प्रमाणात जागा असणाऱ्या ठिकाणांचा शोध घेण्याच्या सूचना ना.थोरात यांनी मनपा आयुक्तांना बैठकीत केली. एमआयडीसीमध्ये असणाऱ्या ऑक्सीजन प्लांट मधून ऑक्सिजनचा पुरवठा सहजपणे होऊ शकतो.
त्यामुळे या प्लांट जवळच शक्यतो जागा शोधण्यास प्राधान्य द्यावे अशी सूचना ना. थोरातांनी बैठकीत केली आहे.
किरण काळे म्हणाले की, भविष्यातील वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा विचार करता ऑक्सिजन बेडचा तुटवडा लक्षात घेत नगर शहरामध्ये १००० ऑक्सिजन बेडची क्षमता असणाऱ्या जम्बो कोविड सेंटरची तातडीने उभारणी करण्यात यावी.
अत्यवस्थ होणार्या कोरोना रुग्णांसाठी या सेंटरमध्ये किमान २०० व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात यावी. रेमेडीसेवर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात यावे.
या ठिकाणच्या सर्व सुविधा या नागरिकांसाठी विनामूल्य करण्यात याव्यात. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सातत्यपूर्ण राहील यासाठी मनपाने देखील स्वतःचा स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट याठिकाणी उभा करावा अशी मागणी काळे यांनी बैठकीत केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|