कोरोना संकट काळात आधिकऱ्यांनी राजकारण करू  नये – आ.विखे 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोणाच्या सांगण्यावरून शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील, तर तेअजिबात खपवून घेणार नाही.

आमचे राजकारण आम्ही पाहून घेवू, तुम्ही या संकटकाळात राजकारण करू नका, अशा शब्दांत भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांना खडेबोल सुनावले आहेत.

कोरोना संदर्भात तालुक्यातील महसूल व आरोग्य विभागाच्याअधिकार्या  समवेत आश्वी खुर्द येथे झालेल्या बैठकीत कोविडच्या लसीवरुन झालेल्या राजकार णामुळे ते चांगलेच संतप्त झाले. यावेळी बोलताना आमदार विखे-पाटील म्हणाले,

सध्याचे वातावरण गंभीर आहे.राजकारण करण्याची हीवेळ नाही.परंतु अशापरिस्थि तीत जर तुम्ही मनमानी करणार असाल, तर तुमच्या विरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करावीच लागेल, तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही,

आशा शब्दांत त्यांनी तालुका आरोग्याधिकार्‍यांचा समा चार घेतला. संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रासाठी आलेला कोविड लसीचा डोस डॉ.सुरेश घोलप यांनी दबावातून जोर्वे येथील प्राथ मिक आरोग्य उपकेंद्रात पाठविल्यामुळे असंख्य सर्वसामान्य नागरिक लसीकरणा पासून वंचित राहिले होते.

केंद्रसरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तालुक्यातील निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण मोहीम सुरू होती. मात्र या आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणार्‍या गावांमधील नागरिकांना लस न मिळाल्याने घरी परतावे लागले होते.

याची आ विखे-पाटील यांनी चौकशी करुनप्रशा सनाला चांगलेच धारेवर धरले. निमगाव जाळी येथील लसींचे डोस डॉ.घोलप यांनी कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावामुळे जोर्वे येथील उपकेंद्रात पाठवले.

याबाबत तहसीलदार अमोल निकम यांना कोणतीच कल्पना नसल्याचे यावेळी उघड झाले. तसेच लॉकडाऊन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासन व गटविकासअधिकार्‍यां नाही धारेवर धरले .

तहसीलदार अमोल निकम यांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले. या घटनेबाबत डॉ.सुरेश घोलप यांच्या विरो धात झालेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकार्‍यांकडे झाल्याने,

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घोलप वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. या बैठकीस 26 गावांमधील प्रमुख कार्यकर्ते, खासगी डॉक्टर,

जिल्हा परिषद सदस्य , रामभाऊ भुसाळ, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe