बेवड्याना झाली दारूची तल्लफ… दारु म्हणून सॅनिटायझरच पिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यक्तिरिक्त सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दारुच्या दुकांनानाही केवळ ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे अनेक तळीरामांना दारु खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच दारुची तल्लफ‌ भागवण्यासाठी दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे. यातील तिघांचा घरी तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe