घरगुती नको, आरोग्य केंद्रात तपासणी करून उपचार घ्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी वाढत आहे.

अनेक नागरिक या कोरोना महामारीच्या भितीपोटी लक्षणे असताना देखील नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता घरगुती उपचार करत आहे

असे न करता नागरिकांनी आपल्या जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या सचिव,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

कोपरगावमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे रुग्णांना उपचार मिळणेसाठी वेळेवर हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही त्यातच ऑक्सिजनचा देखील तुटवडा असल्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची मोठया प्रमाणात हेळसांड होत आहे.

उपाय योजना अभावी अनेक रुग्ण उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जात आहेत.कोरोनाच्या पहिल्या टप्प्यापाठोपाठ दुस-या टप्प्यातही ग्रामपंचायत स्तरावर स्थापन केलेल्या कोरोना समित्यांनी चांगले कामकाज केलेले आहे,

मात्र सध्या कोरोनाची लक्षणे मोठया प्रमाणात फैलावत असल्यामुळे नागरिक उपचाराअभावी दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. याकरीता कोरोना समित्यांनी गावपातळीवर बारकाईने लक्ष घालून कार्यवाही करण्याची गरज आहे.

आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेऊन काही लक्षणे आढळल्यास त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन आपल्याला उपचार करणे सोयीचे होईल.

काळजी करु नका काळजी घ्या तसेच आपले व कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवा,असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe