राहुरी : मुळा धरणाच्या पाण्यात काल (दि. ९) दुपारी साडेचार वाजेदरम्यान एका तरूणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. याबाबत माहिती अशी की, मुळा धरणाच्या जलाशयामध्ये काल (दि. ९) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका तरूणाचा मृतदेह आढळला.
सदर माहिती मिळताच मुळा डॅमचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांसह युवकांनी सदर घटना पोलीस प्रशासनास कळवली. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान सदर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. मात्र, अद्याप सदर मृतदेहाची ओळख पटली नाही.

सागर अशोक नवसारे व मोसिन बशीर शेख या युवकांनी मुळा डॅमचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह पाण्याबाहेर काढला.
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती
- गजकेसरी, धन आणि रवि योगांचा प्रभाव; वृषभ ते मीन राशींसाठी भाग्यवर्धक दिवस
- बँक खाते आणि क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर असतील तर कर्ज अडकेल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य













