प्रेमात सर्व काही माफ : नवरा पॉझिटिव्ह, नवरीने पीपीई किट घालून घेतले सातफेरे!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह, नववधूच्या अंगावर पीपीई किट लग्न लावले. कोरोनाच्या संकटातही अवघ्या काही जणांच्या साक्षीने केरळमधल्या अलाप्पुझा येथे एक आगळा वेगळा असा विवाह सोहळा रविवारी पार पडला.

मेडिकल कॉलेजच्या आवारातच हा विवाह सोहळा पार पडला. प्रेमात सर्व काही माफ असते, हे यानिमित्त पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोरोनाच्या धुमाकूळ दरम्यानच केरळमधील या विवाह सोहळ्याने लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणला.

हॉस्पिटलमधील स्टाफ पीपीई कीट घालून त्यांच्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाले होते. उपस्थितांनी दोघांचे अभिनंदन केले.

कोरोनाच्या अशा कठीण संकटात अवघ्या दोन तुळशीच्या माळा एक मंगळसूत्र अशा अतिशय साध्या पद्धतीने दोघांनीही आपला विवाह उरकला. महत्त्वाचे म्हणजे या लग्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही परवानगी दिली होती.

नवरदेवाला कोरोनाची लागण झालेली असतानाही एक प्रकारची रिस्क घेत दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे नवरदेवाला अलाप्पुझा रुग्णालयात दाखल केले होते.

पण ठरलेल्या तारखेनुसार लग्न होण्यासाठी नववधूने जिल्हाधिकाऱ्यांकडून लग्नासाठी परवानगी मागितली.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये दोघांना लग्न करण्याची परवानगी दिली. रविवारी नववधू पीपीई किट हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि हा अनोखा विवाहसोहळा पार पडला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe