वाढणारी रुग्ण संख्या कमी करणे हेच मोठे आव्हान – महसूलमंत्री

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-सध्याची करोना लाट ही मोठी आहे. यामध्येही कोणीही निष्काळजीपणा करू नये. कोणत्याही कुटुंबांमध्ये एका व्यक्तीला तापाचे किंवा अन्य काही लक्षणे आढळल्यास

त्याचे होम क्वारंटाईन बंद करून तातडीने संस्थात्मक विलीगीकरण करा अशा स्पष्ठ सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगमनेर तालुक्यातील करोना परिस्थिती उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते.

नामदार थोरात म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये करोना चा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य,

नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यासह प्रत्येक पदाधिकार्‍यांनी आपल्या विभागात व प्रभागात अधिक लक्ष देऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे.

गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करताना घरोघर जाऊन प्रत्येकाची तपासणी करा. तापाचे काही लक्षणे आढळल्यास तातडीने त्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करावे.

या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य पातळीवर आपण सातत्याने काम करत असून जिल्ह्यात करता व तालुक्या करता ऑक्सिजन व रेमडिसीवर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

मार्ग निघत आहे. मात्र वाढणारी रुग्ण संख्या कमी करणे हेच मोठे आव्हान आहे. ज्या गावांमध्ये जास्त रुग्ण संख्या आहे तेथे पोलिस प्रशासनासह सर्वांनी अधिक दक्षतेने काम करा.

गावच्या सर्व कर्मचार्‍यांना सोबत घेऊन पदाधिकार्‍यांनी नागरिकांच्या जागृते बरोबर रुग्ण वाढ आपल्या गावात होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घ्यावी असे आवाहनही नामदार थोरात यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe