अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे,तसेच जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.सर्वत्रच या विषाणूचा प्रसार हा वेगाने होऊ लागला आहे.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना या विषाणूची लागण होत आहे. यातच जिल्ह्यातील अनेक कारागृहातील कैद्यांना देखील कोरोनाचा लागण झाल्याचे स्पष्ठ झाले होता.
याच अनुषंगाने आता जिल्ह्यातील कारागृहातील करोनाबाधित कैद्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महासैनिक लॉन येथे खास कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
यामुळे कोरोनाबाधित कैद्यांवर येथे उपचार करण्यात येणार आहे. दरम्यान या कोव्हीड सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कारागृहातील अनेक कैद्यांना करोनाची बाधा झाली असल्याने स्वतंत्र कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या सेंटरच्या कामाची पाहणी केली. जिल्ह्यातील कैद्यांना करोना उपचार मिळावे यासाठी एकाच ठिकाणी हे कोव्हिड सेंटर उभे करण्यात आले आहे. खास कैद्यांसाठी कोव्हिड सेंटर करण्यात आल्याने त्याचा फायदा होणार आहे.
उपचार वेळेवर मिळणार असून यामुळे पोलिसांवर होणारा ताण कमी होणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणारे कैदी एकत्र करणे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करणे गरजेचे होते
म्हणून नगरच्या मध्यवर्ती ठिकाणी हे सेंटर केले आहे.80 जणांची व्यवस्था व त्यांच्यावर उपचार येथे करून योग्य ती सुरक्षाही येथे देता येणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|