अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जागतिक पातळीवर भारताने सर्वात जलदगतीने तब्बल १४ कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे, असा दावा केंद्र सरकारने रविवारी केला आहे.
अवघ्या ९९ दिवसांमध्ये भारताने लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्याचेही सरकारने सांगितले. प्रामुख्याने महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि केरळ या आठ राज्यांमध्ये ५८.८३ टक्के लस देण्यात आली.
देशभरात २० लाख १९ हजार २६३ सत्रांमध्ये १४ लाख ९ हजार ४१७ जणांना डोस मिळाला. सुमारे ९३ लाख आरोग्य कर्मचारी व सव्वालाख कोरोना योद्ध्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे,
तर ६ लाख आरोग्य कर्मचारी व ६३ लाख कोरोना योद्ध्यांनी दुसऱ्यांदा लस घेतली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, देशात जवळपास ५ कोटी नागरिकांनी पहिला तर ७७ लाख ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. २५ लाखांहून अधिक जणांना गेल्या २४ तासांत लस देण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|