आता सावेडीत ‘या’ ठिकाणी केले जाणार कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार!

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेकांचा बळी जात आहे. नगरसह इतर जिल्‍हयातून अनेक रुग्ण उपचारासाठी शहरात येतात. उपचारादरम्यान काही रूग्‍णांचा दुदैवी मृत्‍यू होत आहे.

त्‍यामुळे नालेगांव अमरधाम येथे अंत्‍यविधीसाठी व्‍यवस्‍थेवर ताण निर्माण झाल्‍यामुळे कोरोना रूग्‍णांची अंत्‍यविधी करण्‍यासाठी वेळ लागत आहे. नातेवाईकांना आपला माणुस गेल्‍याचे असते त्‍याचच गैरसोय होत आहे.

त्यामुळे जिल्‍हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या समवेत सावेडी कचरा डेपो येथे पाहणी करून मृत कोरोना रूग्‍णावर अंत्‍यविधी करण्‍यासाठी सुचना दिल्‍या. त्यानुसार आज येथील साफसफाई करून अंत्‍यविधीला सुरूवात करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संग्राम जगताप यांनी दिली.

विरोधीपक्ष नेता संपत बारस्‍कर म्‍हणाले की, सावेडी कचरा डेपोमुळे या भागाच्‍या वि‍कासकामावर मोठा परिणाम झाला होता. कचरा डेपोच्‍या दुर्गंधीमुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावर मोठा परिणाम झाला होता.

वारंवार कचरा डेपोला लागलेल्‍या आगीमुळे दुर्गंधी पसरली जात होती. त्‍यामुळे या भागातील नागरिकांच्‍या विरोधामुळे डेपो व खत प्रकल्‍प बंद केला आहे.

आमदार जगताप यांच्‍या प्रयत्‍नातून या जागेवर स्‍मशानभूमी व उद्यानासह इतर प्रकल्‍प प्रस्‍तावित करण्‍याचा ठराव मनपाने केला आहे. त्‍यासाठी आरक्षणातील वापरावयाचे प्रयोजन बदलण्‍यासाठी शासनाची मंजूरी घेतली जाणार आहे.

मात्र आरक्षित जागेतील ४० टक्‍के जागेच्‍या वापराबाबत आयुक्‍तांच्‍या अधिकारात निर्णय घेतला असून तातडीने याभागामध्‍ये कोरोना रूग्‍णांच्‍या अंत्‍यविधी होणार आहेत. तरी याच जागेवर आता कायम स्‍वरूपी स्‍मशानभूमी केली जाणार असल्‍याचे बारस्‍कर यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|