बाजारसमितीच्यावतीने ‘या ठिकाणी’ कोविड सेंटर सुरू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोनाची चैन तोडायची असेल तर लॉकडाऊन बरोबर आयसोलेशन कोवीड सेंटरची गरज आहे .

तसेच ग्रामीण भागातील नागरिकाना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कै. दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समितीने वांळुज येथील रामसत्य लॉन येथे शंभर बेडची व्यवस्था केली असल्याचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी सांगीतले.

नगर तालुक्यातील वाळूंज येथील रामसत्य लॉन येथे कै. दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शंभर बेडचे कोवीड आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले, यावेळी ते बोलत होते .

या सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते , आ.संग्राम जगताप, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी कर्डीले म्हणाले नगर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालली आहे .

ऑक्सीजन तसेच इंजेक्शन मिळत नसल्यामुळे नागरिक घरीच उपचार घेत आहे . यामुळे त्याचा स्कोर ही वाढत चालला आहे . या रुग्णाच्या संसर्गमुळे घरातील लोकाना तसेच परीसरात ही रुग्ण संख्या वाढत आहे .

ही चैन वाढत चालली आहे . शहरातील रुग्णालये ग्रामीण भागातील रूग्णाना उपचार घेण्यासाठी परवडत नाही . या रुग्णांची सोय व्हावी या हेतुने बाजार समितीच्या वतीने कोवीड सेंटर सुरू केले .

घिगे म्हणाले या सेंटर च्या माध्यमातुन नगर तालुक्यातील रूग्णांना सर्व सुविधा मोफत उपलब्ध करुन देणार आहोत .

शहरात बेड उपलब्ध होत नसल्यामुळे शंभर बेडची व्यवस्था केली .आजुन दोन दिवसात शंभर बेड असे दोनशे बेड उपलब्ध करुन देणार आहोत . तालुक्यात गरज असेल त्या ठिकाणी कोवीड सेंटर उभे करणार असल्याचे सभापती घिगे यांनी सांगीतले .

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe