राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवार मंगळवारी बैठक घेणार!

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावल्याचे समजते. या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.

मुख्यमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये धुमश्चक्री सुरू असल्याने मुदत उलटून गेली तरी अद्याप सरकार स्थापनेबाबत कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. 

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारच्या पत्रकार परिषदेनंतर दोन्ही पक्षांत चर्चा तरी होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. 

या पार्श्वभूमीवर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशा चर्चांनाही सुरुवात झाली आहे. शरद पवार यांच्या घरी काँग्रेसचे नेते येऊन खलबतं करत आहेत. 
शरद पवार यांच्या भूमिकेलाच आता निर्णायक महत्त्व असणार आहे. त्यामुळे शरद पवार आमदारांना काय मार्गदर्शन करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment