अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने अनेक कठोर नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हाबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे.
त्या अनुषंगाने नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरा संगम (ता.नेवासा) येथे चेकपोस्ट असून जिल्ह्याबाहेर जाणारा-येणारांची कसून चाैकशी केली जात असून पासधारकांनाच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.
नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच टोका, प्रवरा संगम या ठिकाणी नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही जिल्ह्याच्या सीमा येतात. या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देताना पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.
दरम्यान नियम तोडून औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना ‘नो एन्ट्री’ केली आहे. पास असणाऱ्या वाहनांना नगर जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.
पासची व त्या वाहनांचीही पाहणी करून शहानिशा केली जात आहे. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह त्यांचे सहकारी चेक नाक्यावर स्वतः थांबून लक्ष ठेवून आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईदेखील केली जात आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|