नगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायधीश ए. एस. खडसे यांनी १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी राहुल पंडित मगरे (१६, फकीरवाडी) याने गेल्या तीन वर्षांपासून १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार देण्यात आली.
आरोपी हा बकऱ्या चारण्याचे काम करतो. १२ जुलै २०१६ रोजीपासून आरोपी अत्याचार करत होता. दिवाळी निमित्त पीडिता मावशीच्या गावी गेली होती. मात्र मुलीच्या शरीरात बदल दिसल्याने तिने पीडितेला फुलंब्री येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची महिती डॉक्टरांनी दिली.

आरोपीविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून राहुल मगरेला शुक्रवारी सायंकाळी अटक केली. त्याला शनिवारी (दि. ९) जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांच्यासमोर हजर करण्यात आले.
सहायक लोकअभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी त्या दोघांची डीएनए चाचणी करावयाची आहे, वैद्यकीय तपासणी करावयाची असल्यामुळे पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.
- मध्य प्रदेशातील ‘हे’ ठिकाण पाहिलं नाही, तर भारत भ्रमण अपूर्णच! येथील अद्भुत सौंदर्य पाहून थक्क व्हाल
- पार्लरचे हजारो रुपये वाचवा!स्प्लिट एंड्स घरीच करा दूर, हे 4 घरगुती उपाय तुमच्या केसांना देतील नैसर्गिक चमक
- कोरियन ग्लास स्कीनचं सिक्रेट उघड, ‘ही’ 5 फेसमास्क आठवडाभरात त्वचेला बनवतील चमकदार!
- KDMC Jobs 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मेगाभरती! 490 पदे भरली जाणार: जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती..
- लोन क्लोज झाल्यानंतर बँकेला सर्वप्रथम ‘या’ गोष्टीबाबत विचारा, अन्यथा भविष्यात येऊ शकतात मोठ्या अडचणी!