अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राज्यात लसीकरणाच्या मुद्द्यावर उद्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या व्हायरल फोटोवरून चांगलाच टोला लागवला आहे.
यावेळी बोलताना पवार म्हणाले कि, काही लोकांचे विमानात बसलेले फोटो पाहिले. त्यांच्यासोबत बॉक्सही पाहिले.
असा अतिरेक होऊ नये. प्रत्येकानं नियमांचं पालन करायला हवं. मी केवळ सुजय विखे यांचं उदाहरण दिलं आहे.
कारण त्यांचे व्हिडीओ व्हायरल जाले आहेत. कोर्टानेही त्यावर मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे त्यांचं उदाहरण दिलं.
मात्र हा नियम सर्वांनाच लागू पडतो. मग सत्ताधारी असो की विरोधक सर्वांनी संयमाने वागलं पाहिजे. ही महामारी मोठं संकट आहे, त्यावर संयमाने भूमिका घ्या, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान सध्या सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी धावाधाव सुरू असतानाच खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी मात्र आपल्या जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणली.
व स्वत: सोशल मीडियात स्वत:च एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली होती. याच मुद्द्यावरून पवार यांनी विखेंना शाब्दिक टोला लागवला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|