गुप्तधनासाठी तीनशे वर्ष जुन्या वाड्यात खोदकाम; या ठिकाणचा धक्कादायक प्रकार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जुन्या काळी लोक आपल्याजवळील धन हे जमिनीत गाडून ठेवत अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील.

व आजच्या त्या काळात त्या धनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचाही अनेक प्रकरणे तुम्ही पहिली असतील. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा मध्ये घडला आहे.

श्रीगोंदा शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एक तीनशे वर्ष जुन्या वाड्यात अज्ञान व्यक्तींनी गुप्तधनासाठी खोदकाम केल्याचे उघड झाले.

स्थानिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यावर हे खोदकाम करणारे पळून गेले. याबाबत अधिक माहिती अशी कि,

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या भग्न वाड्यात कुणाचीही वर्दळ नसल्याचा फायदा घेत काही अज्ञान व्यक्ती वाड्यातील देवघराच्या बाजूंने खोदकाम करत होते.

मात्र स्थानिकांकडून विचरणा झाल्यावर खोदकाम करणारे पळून गेले असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

दरम्यान संबंधित ठिकाणी खोदकाम करण्यापूर्वी हळद, कुंकू, गुलाल,अगरबत्ती लावून पूजा केल्याचे देखील दिसून आले. याबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe