अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-आजवर नगर शहरातील अमरधाममध्ये कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते.
पण काल अचानक नगर शहराबाहेरील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला. हा अन्याय असून सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात यावेत.

file photo
शहर आणि शहराबाहेरील असा वाद तातडीने थांबवावा, असे निवेदन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रांताधिकारी यांना दिले.
नगर शहरात दररोज कोविडमुळे सुमारे ५५ ते ६० व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. यापूर्वी कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार महानगरपालिकेमार्फत नगर येथील अमरधाम येथे करत आलो.
परंतु रविवारी शहराबाहेरील नागरिकांचे अंत्यसंस्कार थांबवण्यात आले. कुणाच्या आदेशाने हे थांबवण्यात आले, असा सवाल त्यांनी केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|