अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जुन्या वादातून पाच जणांनी एका वृद्ध दाम्पत्यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांसह दगड, लाकडी दांडा तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली.
या मारहाणीत अशोक शंकर लोणारी ( वय 65) व पद्मावती अशोक लोणारी (दोघे रा.ब्राह्मणगाव, ता.कोपरगाव) हे वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहेत.

file photo
दरम्यान याप्रकरणी अशोक लोणारी यांच्या फिर्यादीवरून अरविंद लक्ष्मण लोणारी, मयूर अरविंद लोणारी, लक्ष्मण शंकर लोणारी, कविता अरविंद लोणारी,
कोमल अरविंद लोणारी (सर्व रा.ब्राह्मणगाव, ता.कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक आंधळे करीत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|