अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश दिले आहे. तसेच जिल्ह्यात कठोर नियम देखील लागू करण्यात आले आहे.
असे असतानाही नगर तालुक्यात एका गावी मद्यप्रेमी या नियमांना झुगारून चक्क देवाच्या बरीच आपल्या ओल्या पार्ट्या रंगवत आहे.
नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचा परिसर हा सध्या या तळीरामांचा अड्डा बनला असून, तळीरामांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे जेऊर गावचे आराध्य दैवत देवी बायजामाता मंदिर परिसर तळीरामांसाठी मोक्याचा अड्डा बनला आहे.
या परिसरात दारू, गांजा पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. बायजामाता मंदिर परिसरात, तसेच देवीला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सर्वत्र दारूच्या बाटल्या फोडून काचा करण्यात आलेल्या आहेत.
लॉकडाऊन असल्याने येथे दररोज दर्शनासाठी येणारे भाविक येत नसल्याने मंदिर परिसराचा ताबा तळीरामांनी घेतला आहे. या बेवड्यांकडून देवाचा परिसराची वाताहात सुरु आहे यामुळे या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|