अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रकोप सुरूच असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
15 मेपर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना रूग्णांची संख्या स्थिर असली तरी कमी होत नसल्यानं लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
गेल्या आठवड्यापासून राज्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे.
मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांतील रुग्णसंख्या किंचित घटली आहे. तथापि, नाशिक, नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्येचा आलेख कायम चढता आहे.
महाराष्ट्रातील दुसर्या लाटेतील रुग्णसंख्या व सद्यस्थिती पाहता राज्यात आणखी किमान 10 ते 12 दिवस लॉकडाऊनसदृश कडक निर्बंधांची गरज भासते.
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यावेळी राज्यातील लसीकरण मोहिमेबाबत आणि कोरोना परिस्थितीबाबत भाष्य करणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा अंदाज राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकित टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे.
त्यामुळे 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|