त्या हॉस्पिटलची CID मार्फत चौकशी करून गून्हे दाखल करा; मनसेची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-शहरातील एका हॉस्पिटल मध्ये आज ऑक्सिजन अभावी सात रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्या हॉस्पिटल मध्ये रुग्णांचा मृत्यू झाला त्या हॉस्पिटल चे नाव प्रशासन कडून अजूनही प्रसिध्द होत नाही.

हे रुग्ण कोरोना आजारावरील उपचार घेत होते की ईतर आजारांवर उपचार या रूग्णांवर सुरू होते हे हि जाहिर होत नाही. त्यामुळे संबंधत हॉस्पिटल मध्ये सात रुग्णांच्या मृत्यू बाबत प्रशासन आणि हॉस्पिटल काही महिती लपवत असल्याचे दिसत आहे.

याच हॉस्पिटल मध्ये कोरोना अनेक रूग्णांवर उपचार सुरू होते. तसेच या हॉस्पिटल मध्ये ऑक्सीजन पुरवठा सुध्दा सुरळीत होता असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मग हे मृत्यू झालेच कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ह्या सर्व प्रकाराला त्याला सर्वस्वी हॉस्पिटल मधील डॉक्टर तसेच स्थानिक व्यवस्था जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे नगर पुणे रोडवरील हॉस्पिटल मध्ये सात रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याची चौकशी जिल्हा पातळीवर तसेच महानगपालिकेमार्फत सुरू आहे.

परंतू सात रुग्णांचा मृत्यू झाला त्या हॉस्पिटलच्या मालकांचे हे राजकीय हितसंबंध असल्यामुळे चौकशीमध्ये राजकीय हस्तक्षेप होईल याची आम्हाला खात्री आहे.

त्यामुळे स्थानिक जिल्हा तसेच महानगरपालिका, स्थानिक पोलीस यंत्रणेवर आमचा विश्वास नाही तसेच मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाइकांचा आवाज दाबण्याचा दडपण्याचा प्रकार सुरु आहे असे दिसून येते.

स्थानिक राजकीय हितसंबंध संबंधीत डॉक्टरचे असल्यामुळे पोलीस यंत्रणेकडून सात मृत्यूला जबाबदार असणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई होईल असे वाटत नाही.

त्यामुळें सीआयडी मार्फत सात रूग्णांच्या झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी व सबंधित डॉक्टर हॉस्पिटल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा व मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना न्याय मिळावा हि मनसेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत

आपण तातडीने लक्ष्य घालावे हि नम्र विनंती. असे निवेदन मनसेचे नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ईमेल द्वारे पाठवून मागणी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe