भारतीय जैन संघटनेतर्फे २५० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) वतीने कोविडमध्ये गेल्या १३ महिन्यात सर्वच पातळीवर मोठ्याप्रमाणावर काम सुरु आहे. यावेळी संपूर्ण देशात ऑक्सिजनची मोठ्याप्रमाणावर कमतरता भासत आहे.

म्हणून बीजेएसने “MISSION OXYGEN BANK” ही योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सुरुवातीला शहरामध्ये व नंतर खेड्यापाड्यात जिल्हा पातळीवर ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचा पुरवठा हॉस्पिटल्सला करून तसेच काही ठिकाणी OXYGEN BANK तयार करून लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम बीजेएस मार्फत करण्यात येत आहे.

खेड्यापाड्यात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल तेव्हा अनेक रुग्णांना तत्काळ ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे. अशा वेळी ऑक्सिजन अम्ब्यूलंसची संख्या खूपच कमी असल्यामुळे रुग्णांना खेड्यातून शहरामध्ये पाठविणे अवघड होणार आहे.

त्यासाठी रुग्णांना खेड्यातून शहराकडे पाठविण्या ऐवजी ऑक्सिजनलाच शहरातून खेड्यामध्ये पाठविण्याचा हा उपक्रम आहे. बीजेएस या उपक्रमांतर्गत संपूर्ण भारतात २०००-५००० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वितरीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्यापैकी २५० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण आज पुण्याचे महापौर मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ, विभागीय आयुक्त मा. श्री. सौरभजी राव, पुणे महानगरपालिका आयुक्त मा. श्री. विक्रमजी कुमार व जिल्हाधिकारी मा. श्री. डॉ. राजेशजी देशमुख यांच्या शुभहस्ते पुणे व पिंपरी-चिंचवड मधील रुग्णालयांना करण्यात आले.

यावेळी बीजेएस संस्थापक व ज्येष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथ्था आणि विविध हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच श्री. मोतीलाल ओसवाल, मुंबई यांच्या माध्यमाने नंदुरबारसाठी २०० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर पुरविण्यात येणार असून त्यापैकी १०० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचा पहिला लॉट पुण्याहून रवाना होत आहे.

नंदुरबार हा आदिवासी बहुल प्रदेश असल्यामुळे ऑक्सिजन अभावी आदिवासी बांधवांचे हाल होऊ नये म्हणून श्री. मोतीलाल ओसवाल यांनी हे पाऊल उचलले आहे. तसेच मुंबईमधील पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी १० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर रवाना केले जाणार आहेत.

या निमित्त महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक, प्रोफेशनल्स, कारखानदार यांना विनंती आहे की, आपणही आपल्या परीने एखाद्या जिल्ह्याची निवड करून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर पुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून आपण सर्वजण मिळून महाराष्ट्राला कोरोनामुक्त करू शकू, असे आवाहन शांतिलाल मुथ्था यांनी केले.

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, दिल्ली, छत्तीसगड, उत्तरप्रदेश इत्यादी राज्यांमध्ये सुद्धा २००० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर बीजेएसच्या वतीने पुढील आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहे. सर्व देणगीदारांचे मनस्वी आभार.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe