अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला रेमडेसिविरचा आवश्यक तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा आहे.
जिल्हा प्रशासन रेमडेसिविरचे वाटप केवळ रुग्णालयांना करत आहे. कुठल्याही दुकानात ते मिळत नाही. असे असताना डाॅक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर उपलब्ध करण्याबाबत सांगणे अयोग्य आहे,

असे आमदार लहू कानडे यांनी बुधवारी तहसील कार्यालयात झालेल्या खासगी कोविड सेंटर संचालकांच्या बैठकीत सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.
सर्वच डॉक्टरांनी रेमडेसिविरच्या तुटवड्याबाबत बैठकीत चिंता व्यक्त केली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबतही काळजी वाटत असल्याची भावना बोलून दाखवली. त्यावर आमदार कानडे म्हणाले, सध्याच्या कठीण परिस्थितीत डॉक्टर जनतेसाठी परमेश्वराचे प्रतिरूप आहेत,
म्हणून लोकांमध्ये भीती निर्माण होईल अशी कृती करू नये. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरी थांबण्याऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेण्याचा सल्ला देण्यात यावा.
रुग्ण वारंवार एचआरसीटी चाचण्या करून घेणार नाही याकडेही लक्ष द्यावे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही, यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्नशील आहोत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|