अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-अकोले शहरासह तालुक्याला बुधवारी संध्याकाळी ७ नंतर वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले.

उघड्यावर ठेवलेला कांदा भिजला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाला. उष्णतेचा पारा खाली उतरण्यास या पावसाची मदत झाली.

त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मेहेंदुरी, इंदोरी, आंबड, नवलेवाडी, धुमाळवाडी, परखतपूर, सुगाव, कुंभेफळ, तांभोळ, वीरगाव, देवठाण, गर्दणी, ढोक्री, उंचखडक, वाशेरे, कळस,

कोतूळ, राजूर, गणोरे, चास, लिंगदेव येथे पावसाने हजेरी लावली. अकोल्यात दूध घालण्यासाठी व इतर कामानिमित्त आलेले लोक पावसात अडकून पडले.

वादळी वाऱ्यामुळे दक्षता म्हणून महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांना बराच वेळ अंधाराचा सामना करावा लागला. सुमारे तासभर पाऊस सुरू होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe