अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात गेल्या उतरतीकडे असलेल्या कोरोना विषाणूने नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच असून अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत एकूण 2 हजार 935 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील शहर व तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
गेल्या 24 तासाच 2 हजार 935 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली. 657 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ नगर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहे.
नगर तालुक्यातील 307 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. राहाता, श्रीगाेंदे, संगमनेर या तालुक्यात दाेनशेच्या पुढे रुग्णसंख्या आहेत. नेवासे, पारने, पाथर्डी, श्रीरामपूर, काेपरगाव, शेवगाव, जामखेड, राहुरी या तालुक्यांमध्ये शंभरच्या पुढे रुग्णसंख्या गेली आहे. कर्जत, भिंगार शहर, अकाेले येथे रुग्णसंख्या कमी आढळली आहे.
जिल्हा रुग्णालयातील प्रयाेगशाळेनुसार 794, खाजगी लॅबनुसार 1 हजार 242 आणि रॅपिड चाचणीमध्ये 899 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|