ना ऑक्सिजन, ना रेमडेसिविर तरीही दिडशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण होमिओपॅथी उपचाराने बरे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे सर्वच हॉस्पिटल गच्च भरले असताना, अनेक रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी तर ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनसाठी पळापळ करताना दिसत आहे.

मात्र कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी उपचार पध्दती संजीवनी ठरत आहे. शहरातील दिडशेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांसह परिस्थिती खालावलेल्या ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांना देखील होमिओपॅथीच्या औषधाने बरे केले असल्याची माहिती होमिओपॅथी तज्ञ डॉ. प्रमोद लंके यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढले आहे. अनेक रुग्ण दगावत असताना सर्वसामान्यांमध्ये या आजाराची मोठी दहशत निर्माण झाली आहे. तर हॉस्पिटलचे लाखोच्या घरात येणारे बिल पाहून सर्वसामान्यांना कोरोनाच्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलची पायरी चढणे देखील अवघड बनले आहे.

सर्वसामान्यांसाठी परवडेल व गुणकारी होमिओपॅथी उपचार पध्दती कोरोनावर प्रभावी असल्याचे डॉ. लंके यांनी मोठ्या संख्येने रुग्ण बरे करुन सिध्द केली आहे. कुठल्याही विषाणूजन्य आजारात ताप येणे हे त्याचे सर्वसामान्य लक्षणे असते.

परंतु बहुतांश लोकांना ताप आल्यास ते घाबरून जातात व ताप घालवण्यासाठी वेगवेगळे उपचार करतात. जो ताप रुग्णांचे रक्षण करण्यासाठी शरीराने आणलेला आहे. तो ताप त्या विषाणूला रुग्णांमध्ये अति संक्रमण करू देत नाही.

म्हणून पहिल्या टप्प्यात बहुतांशी रुग्णांमध्ये ताप गेला की, रुग्णाला निमोनिया होण्याची भीती वाढते. ही प्रक्रिया सर्वच रुग्णांमध्ये होते असे नाही. यातील वेगवेगळ्या रुग्णांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे.

होमिओपॅथी औषध अचूक निवडल्यावर रुग्णांचा असणारा ताप एका उच्च बिंदूपर्यंत वाढून तो नाहीसा होतो व रुग्ण या आजारातून बरा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील कोरोनाने बाधित झालेले संपुर्ण कुटुंब होमिओपॅथी औषधाने बरे झाले आहेत.

त्यापैकी एकाची गंभीर परिस्थिती निर्माण होऊन निमोनिया झालेला रुग्ण पंधरा दिवसांनी विना ऑक्सिजनने बरा झाला. हा गंभीर रुग्ण चांगला झाल्याने त्या कुटुंबीयांचा होमिओपॅथी उपचारावर मोठा विश्‍वास बसला.

त्यांच्या पुण्यातील मावशीचा एचआरसिटीचा बारा स्कोर असतानादेखील डॉक्टरांच्या सल्ल्याने होमिओपॅथी उपचार करून घेतले. त्या रुग्णाचा एचआरसिटी स्कोर अवघ्या सात दिवसात पाच वर आला आहे.

आनखी एक पुण्यात आयसीसूमध्ये ऑक्सिजनवर गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. नगर जिल्ह्यातील खेडे गावातील काही रुग्ण बरे झाल्याने ग्रामीण भागातून उपचारासाठी संपर्क साधला जात आहे.

नगर शहरासह केडगाव, चिखली, भोरवाडी, चास, घोसपुरी, कामरगाव, पारनेर इतरही बरेच गावातील कोरोना रुग्ण बरे झाले असून, इतर रुग्णांवर उपचार सुरु आहे.

अशाच पध्दतीने अनेक रुग्ण कमी खर्चात ठणठणीत होत असल्याने होमिओपॅथी उपचार पध्दतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून, अनेक रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना होमिओपॅथी उपचार पध्दती आधार व प्रभावी ठरत असल्याची माहिती डॉ. लंके यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe