अहमदनगर : भिंगारहून नगरकडे येत असलेल्या दुचाकीला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती जखमी झाली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छगन झुंगाजी काळे (वय ७५, रा. लकारे गल्ली, भिंगार) हे सेवानिवृत्त कर्मचारी भिंगारकडून नगरकडे त्यांच्या दुचाकीवरून येत असताना एका लाल रंगाच्या चारचाकी वाहनाने (एम. एच. २० सी.एच. २२७६) काळे यांच्या दुचाकीस धडक देवून त्यांच्या दु:खापतीस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला आहे.

ही घटना घडताच सदर चारचाकी चालक घटनास्थळावरून निघून गेला. या प्रकरणी काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज ! योजनेसाठी 410 कोटी रुपयांचा निधी वर्ग, कधी मिळणार सप्टेंबरचा हफ्ता?
- Pm Kisan योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार लाभ?
- दिवाळीत नवीन कार खरेदी करणाऱ्यांना मिळणार मोठी भेट! Hyundai कंपनीच्या ‘या’ कारवर मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट
- 12 महिन्यात श्रीमंत व्हायचंय का ? ‘हे’ 4 शेअर्स एका वर्षात 51 टक्क्यांपर्यंत रिटर्न देणार, पहा यादी
- मोठी बातमी ! आता ‘या’ बड्या कंपनीचे डीमर्जर होणार, गुंतवणूकदारांना मिळणार इतके मोफत शेअर्स, रेकॉर्ड डेट आत्ताच नोट करून घ्या