कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता : नितीन गडकरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- सध्या दुसरी लाट आली आहे, मात्र तिसर्‍या आणि चौथ्या लाटेचा धोका असल्याचे गडकरी यांनी नागपुरात सांगितले.

जगात काही ठिकाणी तिसरी लाट आल्याचेही गडकरी म्हणाले. नागपुरात स्पाईस हेल्थच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्टिंग लॅबचे उद्घाटन झाले.

हे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ही दुसरी लाट आहे.

इतर ठिकाणची परिस्थिती पाहता तिसरी आणि चौथी लाट लक्षात घेऊन दूरचा विचार करावा लागेल. यासाठी आतापासूनच विचार होणेही गरजेचे आहे.

यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटात संघर्ष करून यात संकटावर मात करायची आहे.

एकमेकांची मदत करून पुढे जायचे आहे. आत्मविश्वासाने, हिम्मत ठेवून एकमेकांची मदत करायची आहे. डॉक्टर, पोलिस, मेडिकल स्टाफ,

सफाई कामगार जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. या सर्व कोविड योध्दांना मी हात जोडून त्यांच्या पाया पडून वंदन करतो असे भावनापूर्ण उद्गगार गडकरी यांनी व्यक्त केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe