अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील माळवाडी शिवारात वाळूचा ट्रक रिव्हर्स घेत असताना ट्रक चालकाच्या दुर्लक्षाने ट्रकच्या पाठीमागे असलेली दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली आली.
त्यामुळे अवैध वाळू उपसा करणारे आणि स्थानिक नागरिक यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे हे प्रकरण बेलवंडी पोलिस आणि तहसीलदार यांच्याकडे गेले असता,
त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता स्थानिकांनी याठिकाणी बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याची तक्रार केली.
त्यामुळे तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांनी तालुक्यातील म्हसे, माठ, माळवाडी, खेडकर वस्ती भागांतील घोड नदी पात्रात अवैध वाळु उपसा करणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या १० यांत्रिक फायबर बोटी आणि सेक्शन बोटी जप्त करुत जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या.
श्रीगोंदा तहसीलदार प्रदिप पवार आणि बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना म्हसे, माठ, माळवाडी, खेडकर वस्ती येथील घोडनदी पात्रात काहीजण यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळूउपसा करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला यावेळी काहीजण फायबर व सेक्शन बोटीने अवैध वाळुचा उपसा करत असताना मिळुन आले.
मात्र त्यांना पथकाची चाहूल लागताच ते नदीतील पाण्यात उड्या मारुन पळुन गेले. महसूल आणि पोलिसांनी या कारवाईत १० फायबर बोटी व सेक्शन असा कोट्यवधी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|