थोरात तुम्ही थोर आहात… लसीकरणासाठी महसूल मंत्री देणार एक वर्षाचे मानधन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक वर्षाचे मानधन मोफत लसीकरणाकरीता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे.

तसेच थोरातांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या सुमारे 5 हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा निधीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणार आहे.

राज्यातील कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढताना मृत्युच्या प्रमाणात वाढ होत आहे.

त्यामुळे अधिक प्रमाणात लसीकरणावरभर देण्यात येत आहे. यामुळे आता राज्याच्या तिजोरीवर बोजा पडत आहे. असे असताना आपले वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले कि, आधी लसीकरण झाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. या लसीकरणासाठी मोठा खर्च येत आहे. मी माझ्यावतीने मदत करत आहे.

मी एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री रिलीफ फंडात देत आहे. आमच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे मानधनही देत आहेत.

बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूह या कोरोना संकटातही जनतेच्या मदती करता पुढे आला आहे.

थोरात कारखान्याने नुकतेच 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले असून एसएमबीटी या संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध रुग्णालयात व केअर सेंटरमध्ये वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe