अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पारनेर शहराचे आमदार लोकनेते निलेश लंके यांनी कोरोणा महामारीच्या काळात 1200 बेडचे कोवीड सेंटर उभारणी करून आरोग्य विषयी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राशीन येथील जनजागृती प्रतिष्ठानच्या वतीने निलेश लंके यांना कोरोना योद्धा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले
यावेळी जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरच्चंद्र आढाव, अक्षय उघडे, निलेश लंके प्रतिष्ठान चे तालुकाध्यक्ष विजय औटी, शहराध्यक्ष ओंकार नवखेले, संकेत साळवे, महेश थोरात, कृष्णा अनारसे आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणाले की पारनेर शहराचे आमदार लोकनेते निलेश लंके यांनी कोरोणा महामारीच्या काळात 1200 बेडचे कोवीड सेंटर उभारणी करून आरोग्य विषयी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे कोरोना योद्धा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|