अहमदनगर :- अवकाळी पावसाने नगर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना डोळ्यासमोर शेती पिके उद्ध्वस्त होताना बघावी लागत आहेत. शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. त्यांचे अश्रूपुसण्यासाठी पुढाऱ्यांचे निव्वळ दौरेच सुरू आहेत.
प्रशासन पंचनामे करीत आहे. याद्वारे शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील हजारो एकर सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी, डाळिंबासह फळबागा या पावसाने अडचणीत आल्या.
महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून पडणारा पाऊस, शेतात साचलेले पाणी, खराब झालेली पिके यामुळे नगर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात शेती उद्ध्वस्त झाली आहे. व्यापारी व बाजारपेठाही अडचणीत आल्या आहेत. काही विक्रेत्यांनी ‘उधारी बंद’ असे फलक लावले आहेत.
राष्ट्रीयीकृत बँका व पतसंस्था यांच्याकडून कर्ज वितरण बंद आहे. अवकाळी पावसाने सगळीच स्वप्ने चक्काचूर झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कधी कमी तर कधी जास्त पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.
कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या या शेतकऱ्यांना सरकारने वीज बिल माफ, उतारा कोरा आणि भरीव स्वरुपात मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी भरपाईचे निकष बदलून जाचक अटी दूर करण्याची गरज आहे.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार