अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपली भूमिका मांडली आहे.
आताचे दिवसही जातील, ते सुवर्णदिन पुन्हा येतील 2010 चा महाराष्ट्राचा 50 वा वर्धापननदिन आठवतोय. तिसरी लाट आलीच तर त्याला तोंड देण्यासाठी सरकारची तयारी सुरू आहे –

अचानक रेमडेसिविरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सगळ्यांना रेमडेसिविर पाहिजे. आपल्याला रोज सरासरी ५० हजार इंजेक्शनची गरज आहे. याचं वितरण केंद्राने स्वत:च्या हातात घेतलं आहे. सुरुवातीला आपल्याला २६ हजार ७०० च्या आसपास इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली.
मी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य करून ४३ हजार रेमडेसिविरची सोय करण्यात आली. आज रोज ३५ हजारच्या आसपास रोजचे रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत.
पण एक गोष्ट आहे, की आपल्या टास्क फोर्सने आणि तज्ज्ञांनीही इशारा दिला आहे. रेमडेसिविरचा अनावश्यक वापर करु नका. गरजेपेक्षा जास्त दिलं तर औषधाचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्यात १ कोटी ५८ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात आहे. दुर्दैवाने सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रात आहेत. 12 कोटी डोस महाराष्ट्राला लागणार आहेत, त्यासाठी एकरकमी चेक देण्याची तयारी महाराष्ट्राने ठेवली आहे. पण लसीचा पुरवठा मर्यादित आहे.
उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु करतोय. 18 म्हटलं तर युवा आलाच, आणि युवा आले तर उत्साह आलाच. कोविन अॅप काल क्रॅश झालं. थोडं मार्गी लागेपर्यंत असं होणार. मी पंतप्रधानांना विनंती केली आहे, राज्यांना आपआपली अॅपची परवानगी द्या, ते अॅप केंद्राशी कनेक्ट करा. असं झालं तर सोय होईल.
अॅपवर नोंदणी करुन, माहिती मिळेल, त्या वेळेप्रमाणे केंद्रावर पोहोचा. महत्वाचं म्हणजे लस मर्यादित आहे. साधारण जून-जुलैपासून पुरवठा वाढेल. तोपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये. तिथे झुंबड उडतेय हे मी समजू शकतो. ज्या बातम्या येतात त्याने मन विष्ण्ण होतं. उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होतंय,
उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझं वचन आहे, माझ्या नागरिकांचं लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका
लसीकरण, आरोग्यसेवा, उपाययोजना यात राज्य आघाडीवर आहे. लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा राज्याने पार केला आहे.ऑक्सिजन वाहून नेण्यास अडचणी असल्यास ऑक्सिजन प्लांटजवळ कोविड सेंटर उभारण्यावर भर देणार- मुख्यमंत्री.
महाराष्ट्राची जनता संयम पाळत आहे, लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका.लस मिळवून नागरिकांना दिल्यास रुग्णवाढ रोखता येणार आहे. मे महिन्यात 18 लाख डोस मिळणार आहेत. अधिक लससाठा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
निर्बंधांमुळे रुग्णवाढ रोखण्यात यश आतापेक्षा कडक निर्बंधांची गरज असली तरी ते लावण्याची गरज नाही. कामगार दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झालेल्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













