अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-सन 2021-22 चे शैक्षणिक वर्ष 14 जूनपासून सुरू करावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यात 1 मे पासून ते 13 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी लागू असणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू होणार असल्याने तेव्हापासून शाळा सुरू कराव्या लागणार आहेत .
राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. यात असं स्पष्ट करण्यात आलं आहे की, ‘शनिवार १ मे २०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आल्या आहेत.
सुट्टीचा कालावधी १३ जून २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्यात यावा. पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात.
तसेच जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळा मात्र 28 जून पासून सुरू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा सध्याच्या करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर वर्ग ऑनलाइनच होणार आहेत. स्थानिक प्रशासनाने शाळांबाबच स्थानिक कोविड स्थितीनुसार निर्णय घ्यायचा आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|