दहा दिवसात पोलिसांनी वसूल केले दीड लाख

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची संक्रात सुरूच आहे. यातच शिर्डी पोलिसांनी गेल्या दहा दिवसात केलेल्या कठोर कारवाईने जवळपास दीड लाख रुपये दंड आकारण्यात करण्यात आला आहे,

अशी माहिती माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने फोफावत आहे. यामुळे राज्य शासनाने अनेक कठोर निर्बंध लागू केले आहे.

यातच वाढत्या कोरोनाच्या आकडेवारीने प्रशासनाचे काम देखील वाढवले आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन देखील करण्यात येत आहे.

यातच शिर्डी शहरात लॉकडाउन व संचारबंदी धरतीवर शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्‍या लोकांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती.

त्या माध्यमातून जवळपास दहा दिवसात दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बेफिकीर नागरिक आरोग्याची काळजी न घेता शासकीय नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.

त्या धर्तीवर यापुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News