अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच चढलेला दिसून येत आहे. अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे.
मात्र वाढत्या तापमानापासून नगरकरांना आज काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे.
आज कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी पोहेगांव चांदेकसारे वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. पोहेगांव सोनेवाडी चांदेकसारे परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली.
दरम्यान येते काही दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. यातच गुरुवार सायंकाळपासून जिल्ह्यातील हवामान बदलाला सुरुवात झाली. आणि आज संध्याकाळी सात नंतर वारा व विजेच्या कडकडाटासह या परिसरात पाऊस पडला.
शेतकऱ्यांची धावाधाव :- अचानक पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली. शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांदा काढणीला आला आहे तो शेतातच पडून आहे. त्यामुळे आपल्या शेतातील काढलेला माल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|