अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- सडपातळ बांधा, अंगात सफारी, डोक्यात टोपी ,तोंडात शिट्टी, हातात काठी असलेली एक व्यक्ती आपण अहमदनगर शहरातील विविध चौकात उभे राहून ट्रॅफिक कंट्रोल करताना पाहिली असेलच.
त्यांचं नाव आहे अविनाश देडगावकर. त्यांना स्वतःला ‘देशसेवक’ म्हणवण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. गेली चाळीस वर्षे ते गोरगरीब, निराधार ,दिव्यांग लोकांसाठी काम करत आहेत. महाराष्ट्र पोलीस मदतनीस म्हणून अनेक वर्षांपासून ते उन्हातान्हात रस्त्यावर उभे राहून ट्रॅफिक कंट्रोल करतात.
पोलीस बांधवांचे काम त्यामुळे कमी होते आणि ताण हलका होतो. सध्या कोरोना काळातही ते नाकाबंदी असो वा चौकाचौकातील तपासणी, ते पोलिसांच्या जथ्यात उभे राहून आपल्याला काम करताना दिसतील. त्यांना या कामासाठी कोणतीही संस्था मानधन देत नाही.
निःस्वार्थी सेवा करण्यात अविनाश देडगावकर धन्यता मानतात. त्यांना पोलीस सेवेत काम करण्याची इच्छा होती मात्र काही कारणास्तव ती पूर्ण झाली नाही म्हणून चाळीस वर्षापासून ते पोलिसांना सहकार्य करीत आलेले आहेत.
सध्या देडगावकर अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर असलेल्या डी एस पी चौकात ते येणाऱ्या गाड्यांची चौकशी करणे, बाहेर पडण्याचे कारण विचारणे आणि विनाकारण फिरताना कुणी आढळल्यास पोलिसांकडून रीतसर पावती करून
देणे हे काम करताना दिसतात. एखाद्या दानशूर संस्थेने अथवा व्यक्तीने त्यांना मानधन द्यावे अशी अपेक्षा ते बोलून दाखवतात…
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|