अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहाटे चार वाजल्यापासूनच रांगेत उभे राहून देखील लस न मिळाल्याने संतप्त झालेल्या
काही नागरिकांनी दवाखान्यातील काचेच्या खिडक्यांवर हात डोके आपटून काचा फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याकडून समजली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसगावसह परिसरातील जवळपास पंचवीस-तीस गावातील लोक कोरोना लस घेण्यासाठी येतात. काही लोक दुसरा डोस घेण्यासाठी येतात तर काही लोक पहिला डोस घेण्यासाठी.
नेमकी कोणता डोस आज दिला जाणारा याची माहिती कोणालाच मिळत नसल्यामुळे पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पहाटे चार वाजल्यापासूनच रांगेत उभे राहतात.
शुक्रवारी १४० डोस आले होते, परंतु गर्दी मात्र चारशे ते पाचशे लोकांनी केली सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत जे लोक या ठिकाणी आले. त्यांना टोकन देण्यात आले परंतु पहाटे चार पाच वाजताच नंबर लावून पुन्हा जे घरी गेले होते,
त्यांनी अकरा बारा वाजल्यानंतर येऊन या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तिसगाव येथील एका माजी सैनिकावर हे टोकन देण्याची जबाबदारी रुग्णालयाकडून देण्यात आलेली आहे. परंतु काही लोकांनी संबंधित वशिलेबाजी करीत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला.
तर पहाटे पाच पासून रांगेत उभे राहून देखील लस न मिळाल्याने काही संतप्त नागरिकांनी दवाखान्याच्या खिडकीवर हात, डोके आपटून आपला संताप व्यक्त केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|