अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोना महामारीशी लढा देताना आपण थकलो असू परंतु हा विषाणू अद्याप थकलेला नाही, असे सांगत सरकारने कोरोना नियमांचे आणि उपचारांसाठीच्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज व्यक्त केली.
कोरोनाचे गांभीर्य समजून घ्या आणि उगाच मर्दुंमकी गाजवू नका, असा इशाराही सरकारने दिला.कोरोनासंदर्भातील शुक्रवारी आपल्या नियमित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी कोरोना परिस्थितीला गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली.
कोरोना-बिरोना काही नसून हा एक आंतरराष्ट्रीय कट असल्याचे काही जण म्हणतात. मला मास्कची गरज नाही, चला पार्टी करू, कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा मनमर्जीने जगा, अशी काही लोकांची मानसिकता आहे.
मात्र बिनकामाचे शौर्य दाखवण्याची ही वेळ नाही. एकीकडे काही लोक अजिबात गांभीर्याने घेत नाहीत तर दुसरीकडे काही लोक अतिरेक करत आहेत. मी कोरोनाबाधित झालो म्हणजे मी मरणारच, अशी लोकांची समजूत झाली आहे.
ते लगेच रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचे सिलिंडर मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र या दोन्ही टोकाच्या गोष्टी चुकीच्या असून यामुळे अधिक गोंधळ, तणाव निर्माण होत असल्याचे अग्रवाल म्हणाले.
कोरोना नियमावलींचे गांभीर्याने पालन करण्याची गरज सरकारने व्यक्त केली. आपण थकलेले असलो तरी कोरोनाचा विषाणू थकलेला नाही.
कोणत्याही पातळीवरील थोडाही हलगर्जीपणा संपूर्ण समाजावर परिणाम करू शकतो. या संकटातून सावरण्यासाठी आपल्याला सर्वांच्या मदतीची गरज आहे, असे अग्रवाल म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|