अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाचे हजारोच्या संख्येने बाधित आढळून येत आहे.
यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळते आहे.
नुकतेच राहाता तालुक्यात शुक्रवारी पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून गेल्या 24 तासात तालुक्यात 280 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 301 जण कोरोनमुक्त झाले आहे.
बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयात 47 खासगी रुग्णालयात 167 तर अँटीजन चाचणीत 66 रग्ण आढळून आले आहेत. तर 301 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
तालुक्यात राहाता शहरात 13, शिर्डी-25 तर लोणी बुदुक 140, लोणी खुर्द-44, वाकडी-22, असे रुग्ण आढळून आले आहेत.
करोनाला आळा घालण्यासाठी जास्त जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे तसेच नियमाचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|