गुरे चारण्यासाठी गेलेल्या आजी – नाती परतल्याच नाही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-आजी नातीचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील येथे चिंचोली गुरव येथे घडली आहे.

शुक्रवारी दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत भक्ती एकनाथ आभाळे (वय ७) व प्रमिला श्रीराम आभाळे (वय ४५) असे मृत्यू झालेली आजी नातीचे नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आजी व नात शेळ्या व गुरे चारण्यासाठी जाधव वस्ती येथे गेल्या होत्या.

यावेळी भक्ती बंधाऱ्याजवळ गेली असता तिचा पाय घसरून बंधाऱ्यात पडली तेव्हा तिला वाचाविण्यासाठी गेलेल्या आजीचा देखील बुडून मृत्यू झाला.

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलीचे वडील एकनाथ श्रीराम आभाळे हे जाधव वस्ती गेले असता त्याना आजी नाती बंधाऱ्यात बुडाल्याचे लक्षात आले.

नंतर त्यांना बंधाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. रात्री आठ वाजेच्या सुमारास या दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe