कोरोना लसीकरण सुरू करा, अन्यथा काम बंद !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. यासाठी नगर शहरामध्ये हमाल पंचायतीचा दवाखाना आहे.

येथे लसीकरण केंद्र सुरू करावे त्याच बरोबर जिल्ह्यातही लसीकरण केंद्र हमाल माथाडी कामगारांसाठी सुरू करावे,

आठ दिवसांमध्ये लसीकरण केंद्र सुरू न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वर्षभरापासून हमाल माथाडी कामगार जोखीम पत्कारून काम करत आहे.अनके कामगार व कुटुंबीय कोरोना बाधित झाले आहे.

त्यामुळे हमाल बांधवांना लसीकरण करावे, यावेळी अविनाश घुले,माजी आमदार चंद्रशेखर घुले उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News