अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा अदर पुनावालां यांना कोरोना लशीसाठी मोठ्या प्रमाणावर धमक्या येऊ लागल्याची माहिती समोर येत आहे.
अशी माहिती खुद्द अदर पुनावाला यांनी दिली आहे. अदर पुनावाला म्हणाले की, देशातील मोठ्या लोकांकडून मला धमक्या मिळत आहेत व माझे शिर कलम केले जाईल अशी भीती मला वाटत आहे’.
कॉल करणाऱ्यांमध्ये भारतीय राज्यांतील मुख्यमंत्री, उद्योग मंडळांचे प्रमुख आणि अनेक प्रभावशाली मंडळींचा समावेश आहे. हे लोक फोनवरून कोविशिल्ड लशीचा तत्काळ पुरवठा करा, अशी मागणी करत आहेत.
अदर म्हणाले, कोविशील्ड लस मिळविण्याची आशा आणि आक्रामकतेची पातळी अभूतपूर्व आहे. सध्या, कोरोना महामारी पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशात पसरत आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणावर भय आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सातत्याने मृत्यूही होत आहेत. काही दिवसांपूर्वीच अदर पूनावाला यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा मिळाली होती.
मात्र, यानंतर आदर पूनावाला यांचे इंग्लंडला जाऊन मुलाखत देणे आणि लसीचे केंद्र भारतातून इतर देशांमध्ये हलवणे याबाबत उलट सुलट चर्चा होताना दिसत आहेत.
यामुळे भारतीय लसीकरणावरती याचा मोठा परिणाम भविष्यात दिसून येण्याचे संकेत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|